दक्षिण पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पर्वती एचएलआर गोल टाकीवरून पद्मावती पम्पिंग स्टेशनला येणार्‍या १००० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत पद्मावतीमधील अवंती सोसायटीजवळ गळती सुरू झाली आहे. या दुरुस्तीसाठी सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पम्पिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग 1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलीसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगरासह आदी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top