स्टिलफॉन्टेन – दक्षिण आफ्रिकेतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफॉन्टेन शहराजवळील बफेल्सफॉन्टेन येथे सोन्याच्या खाणीत बेकायदेशीर खाणकाम करणाऱ्या किमान १०० मजुरांचा खाणीत अडकून मृत्यू झाला. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका गटाने याबाबत माहिती दिली आहे. खाणीत अडकलेले हे मजूर अनेक महिन्यांपासून उपाशी होते. तसेच पाण्यासाठीही झुंजत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदेशीर खोदकाम करताना खाण कामगारांचा मृत्यू झाला .
. ही खाण अनेक दिवसांपासून रिकामी होती.त्यातून अवैधरित्या उत्खनन करण्यात येत होते. आणि याच कामासाठी खाणीत उतरलेले कामगार अनेक महिने खाणीत अडकले होते.मात्र त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते,परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. . हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. या घटनेचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात खाणीत डझनभर मृतदेह इकडे तिकडे पडलेले दिसत आहेत. हे सर्व मृतदेह खाणीच्या आत पडलेले असून ते प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले आहे
. मृत खाण कामगार अनेक दिवसांपासून बंद सोन्याच्या खाणीत अवैधरित्या खोदकाम करत होते. या काळात बाहेरून संपर्क तुटला आणि त्यांना अन्न-पाणी मिळणे बंद झाले. त्यानंतर या खाण कामगारांचा उपासमारीने मृत्यू झाला. या घटनेशी संबंधित माहिती कामगारांनी मोबाईल फोनद्वारे पाठवलेल्या व्हिडिओवरून मिळाली, ज्यामध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह दाखवले आहेत.मायनिंग ॲफेक्टेड कम्युनिटीज युनायटेड इन ॲक्शन ग्रुपच्या म्हणण्यानुसार, मदत कार्यादरम्यान आतापर्यंत २६ मजुरांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे आणि १८ मृतदेह देखील बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, ही खाण एवढी खोल आहे की, सुमारे ५०० कामगार अजूनही तेथे अडकले असावेत.अशी भीती व्यक्त केली जात आहे.