पाटना – उत्तर भारतात सध्या थंडीचा प्रकोप वाढला आहे. याच कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता बिहारमध्येही थंडी वाढल्याने ८ वी पर्यंतचे वर्ग ११ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. तर नववीच्या पुढील वर्ग सकाळी ९ च्या पूर्वी आणि सायंकाळी ४ च्या नंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बिहारच्या हवामान खात्याने दिलेल्या माहित नुसार बिहारच्या उत्तर – पश्चिम,मध्य आणि दक्षिण बिहार मध्ये १० डिग्री सेल्सियसच्या खाली तापमान आहे. या स्थितीत प्रार्थमिक शाळा सुरु ठेवणे शक्य नसल्यचे शिक्षण विभागाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाला कळवले होते. त्यानंतर राजधानी पटनासह , मोतीहारी, दरभंगा , आरा , मुझफ्फरनगर या जिल्ह्यांमधील ८ वी पर्यंतचे वर्ग ११ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थंडीमुळे दिल्ली पाठोपाठ बिहारमध्येही शाळा बंद
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/01/school-closed.jpg)