तिरुमला – तिरुपती बालाजी मंदिरात यापुढे केवळ हिंदूच सेवक राहतील असा ठराव मंदिराच्या नव्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
मंदिराच्या सेवेत असलेल्या बिगर हिंदू सेवकांनी एक तर स्वेच्छानिवृत्ती घ्यावी किंवा दुसऱ्या एखाद्या खात्यात बदली घ्यावी असे पर्याय त्यांना देण्यात आले आहेत. व्यवस्थापन समितीचे नवे अध्यक्ष बी.आर.नायडू यांनी हा निर्णय घेतला असून मंदिरात नेमके किती बिगर हिंदू सेवक आहेत यांची माहिती त्यांनी दिलेली नाही. मंदिरातील ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी ३०० कर्मचारी बिगर हिंदू आहेत. त्यांच्या बरोबरीने मंदिर परिसरात १४ हजार कंत्राटी कर्मचारीही काम करत असतात. नायडू यांनी ३१ ऑक्टोबर रोजी मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्याचवेळी त्यांनी यापुढे तिरुपती मंदिरात केवळ हिंदूच कर्मचारी राहतील असे सांगितले होते.