ठाणे – ठाणे घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागली होती. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच ठाणे महानगर पालिकेचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीची तीव्रता खूप जास्त होती. या आगीमुळे मोठ्या प्रमणात धुराचे लोट पसरले होते. मॉलमधील पुमा बूट्सच्या शोरूमला ही आग लागली. ही आग पसरली त्यामुळे दोन ते तीन दुकानांना ही आग लागली. या दुकानात कपडे आणि इतर उत्पादने होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.