ठाणे – ठाण्याच्या बाळकूम भागात असलेल्या ६ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत काल रात्री उशिरा आग लागली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून इमारतीतील ३५-४० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली.ठाणे-भिवंडी मार्गावरील बाळकूम भागात एक सहा मजली इमारत आहे.या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे धुराचे लोट सर्वत्र परिसरात पसरले होते.या घटनेची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. इमारतीत धूर पसरल्यामुळे ३५ ते ४० रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले. काही मिनिटांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाण्याच्या बाळकूम भागात ६ मजली इमारतीत आग
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/02/FIRE.jpg)