हरारे – दक्षिण आफ्रिकेतील झिंम्बाबवे मध्ये फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या ६० कैद्यांना जीवनदान मिळाले आहे.त्यांना झालेल्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात येणार आहे.जल्लाद मिळत नसल्याने तसेच बहुसंख्य लोकांचा फाशीला विरोध असल्याने फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली
झिंम्बाबवेचे राष्ट्रपती एमर्सन मंगाग्वा यांनी संसदेत या बाबतचा प्रस्ताव पास झाल्यानंतर तातडीने या नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. २०१७ पासून एमर्सन मंगाग्वा यांनी मृत्युदंडाच्या शिक्षेला विरोध सुरु केला होता. कारण १९६० साली स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी त्यानाही फाशीची शिक्षा सुनावन्यात आली होती. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर त्यांची फाशी रद्द करण्यात आली . त्यामुळे फाशीच्या शिक्षेच्या विरोधात त्यांनी सुरुवातीपासूनच आवाज उठवला होता. अखेर आता झिंम्बाबवे मधून फाशीला हद्दपार करण्यात त्यांना अखेर यश आले . सरकारच्या या निर्णयाचे जनतेनेही स्वागत केले आहे.