नाशिक – महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे येत्या २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला एक दिवसाचा महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित केल्याची माहिती कृती समितीने दिली आहे. मुंबईत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे हा बंद स्थगित करण्यात आला.राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील एलबीटी विभाग बंद करण्याची व्यापाऱ्यांची महत्त्वाची मागणी मान्य करण्यात आली असून तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. केंद्रातील व्यापारी कल्याण मंडळाच्या धर्तीवर राज्य कल्याण मंडळ उभारण्याच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या मागण्या मान्य झाल्यामुळे बंद स्थगित करण्यात आला असला तरी जीएसटी व इतर अन्याय कररचनेविषयी राज्य सरकार कोणती भूमिका घेते हे महत्त्वाचे असल्याने हा बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |