नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)च्या पुनरावलोकनाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून काही वस्तूंचे कर कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेईल घेतला जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
सध्या, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)ची चार-स्तरीय कर रचना असून ५, १२, १८ आणि २८ टक्के अशी चार स्तरीय आहेत. चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंवर २८ टक्के इतका सर्वात जास्त कर आकारला जातो, तर पॅक केलेले खाद्यपदार्थ आणि आवश्यक वस्तू सर्वात कमी ५ टक्के कर आहे. जीएसटी दरांमध्ये बदल सुचवण्यासाठी तसेच स्लॅब कमी करण्यासाठी सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन केला आहे. निर्मला सीतारमन म्हणाल्या की, जीएसटी दर तर्कसंगत आणि सुटसुटीत करण्याचे काम तीन वर्षांपूर्वीच सुरू झाले आहे. नंतर त्याची व्याप्ती वाढवण्यात आली गेली. आता काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या वापरातील वस्तूंशी संबंधित असलेल्या वस्तूंच्या दरांचा अधिक सखोल विचार करावा असे त्यांनी परिषदेतील मंत्र्यांना सांगितले. ही संधी गमावता कामा नये. माझ्यासाठी हेदेखील महत्त्वाचे होते. कमी दर हा मूळ हेतू असल्याने आपण दर आणि स्लॅबची संख्या कमी करू शकतो. मला आशा आहे की जीएसटी परिषद यावर लवकरच निर्णय घेईल.