नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालेल्या जम्मू रेल्वे विभागाचे पहिले डीआरएम म्हणजेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून रेल्वे बोर्डाने ई. श्रीनिवास यांची नियुक्ती केली आहे. पठाणकोट ते बारामुल्ला या विभागाची व जम्मू-काश्मीरमधील रेल्वे विस्ताराची जबाबदारी आता जम्मू विभागाकडे असणार आहे.
नव्याने नियुक्त झालेले श्रीनिवास हे सध्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत.फिरोजपूर विभागातून तयार करण्यात आलेल्या या नवीन रेल्वे विभागात पठाणकोट, जम्मू,उधमपूर,श्रीनगर, बारामुल्ला,भोगपूर सिरवाल, पठाणकोट, बटाल – पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर असे विभाग समाविष्ट आहेत. या रेल्वे मार्गाची लांबी एकूण ७४२.१ किमी इतकी आहे.