चीन- जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश असलेल्या चीनमध्ये आता सोन्याचा आणखी मोठा खजिना सापडला आहे. चीनच्या हुनान प्रांतात ८२.८ अब्ज डॉलर्सचे सोन्याचे घबाड सापडले.
हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीला पिंगजियांग काउंटीमध्ये हे सोने सापडले. त्यात ३००.२ टन सोने असल्याचा अंदाज आहे.दोन हजार मीटरपेक्षा जास्त खोलीवर सोन्याचे साठे आहेत.तीन हजारपेक्षा जास्त खोल अंतरावर तब्बल एक हजार टनांपेक्षाही जास्त सोन्याचा साठा असू शकतो, असा अंदाज आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते २०२३ मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान १० टक्के आहे. तरीही जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावानंतर चीनच्या सेंट्रल बँकेने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे.