नवी दिल्ली – चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी भारत २०२७ मध्ये ‘चांद्रयान-४’ प्रक्षेपित करणार आहे. चांद्रयान-४ मध्ये हेवीलिफ्ट एलव्हीएम-३ रॉकेटची किमान दोन वेगवेगळी प्रक्षेपणे केली जाईल. ती मोहिमेतील ५ वेगवेगळे घटक वाहून नेतील. ते नंतर कक्षेत एकत्र जोडले जातील. २०२६ मध्ये खोल समुद्राचा शोध घेण्यासाठी ‘समुद्रयान’मोहिम देखील सुरू करणार असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. तर गगनयान’ही मोहीमदेखील भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या तुकडीसह अवकाशात झेपावेल जितेंद्र सिंह म्हणाले की,’चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणणे आहे. गगनयान मोहिमेत अंतराळवीरांना डिझाइन केलेल्या अंतराळयानातून पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे समाविष्ट आहे. समुद्रयान मोहिमेत समुद्रतळाचा शोध घेण्यासाठी तीन शास्त्रज्ञांना समुद्रात ६,००० मीटर खोलीपर्यंत पाणबुडीतून नेले जाईल.
‘चांद्रयान-४’मोहीम २०२७ मध्ये
