बेळगाव – भुतरामहट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातील निरुपमा नावाच्या सिंहिणीचा आजारपणामुळे मृत्यू झाला.त्यामुळे आता प्राणिसंग्रहालयात कृष्णा नावाचा एकमेव सिंह शिल्लक राहिला आहे.
या प्राणिसंग्रहालयात तीन सिंह आणले होते. त्यातील शौर्य नामक सिंहाचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.त्यामुळे निरुपमा व कृष्णा असे दोनच सिंह शिल्लक होते.आता निरुपमा सिंहिणीचाही मृत्यू झाला आहे. या महिन्याच्या सुरवातीपासूनच निरुपमा आजारी होती.तिच्यावर उपचार सुरु होते.पण खाणे कमी केल्याने तिची तब्येत ढासळत होती.तिला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी तिचा मृत्यू झाला.