मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे लोकांना महिन्याच्या रेशनसाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे.
अन्नधान्याच्या चलनवाढीमुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाईने १४ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी शेंगदाणा तेलाची किंमत १९३.५८ रुपये प्रति लिटर होती.ती गु एक टक्क्याने वाढून १९५.५९ रुपये प्रति लिटर झाली आहे. मोहरीचे तेल २.५ टक्क्यांनी महागून १६७ रुपये प्रतिलिटर तर वनस्पती तेल पाच टक्क्यांनी महागून १४२ रुपये प्रतिलिटर झाले आहे. सोया तेलाची किंमत पाच टक्क्यांनी महागून १४१ रुपये प्रतिलिटर झाली आहे. सूर्यफूल तेलही पाच टक्क्यांनी वाढून १४० रुपयांवरून १४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे. पामतेलाचे भाव सर्वाधिक ८ टक्क्यांनी वाढून १२० ते १२९ रुपये प्रतिलिटर झाले आहेत.