कानपूर – मुंबई संघातील किकेटपटू मुशीर खान कार अपघातात गंभार जखमी झाला. तो वडिलांसोबत कानपूरहून लखनौला जात असताना हा भीषण अपघात झाला. मुशीर खानची कार जवळपास तीन ते चारवेळा उलटली. यामध्ये मुशीर खान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुशीर खान आणि त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भारतीय संघात खेळलेल्या सर्फराज खानचा मुशीर भाऊ असून त्याने अंडर 19 टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. इराणी चषकाचा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौच्या एकना स्टेडियमवर मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मुशीर ईराणी कपसाठी मुंबई टीमसह लखनौला गेला नाही. मुशीर वडिलांसह गावी आजमगढ येथे होता. मुशीर आणि त्याचे वडील नौशाद खान हे दोघे आजमगढ येथून लखनौला जात असताना हा अपघात झालाआता मुशीर खान या सामन्यात खेळू शकणार नाही. हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. तसेच 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुशीर खान बाहेर पडण्याची शक्यता आहे.