कॅलिफोर्निया-अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये काल एक छोटे विमान इमारतीच्या छताला धडकून कोसळले. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ८ जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले.या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. याशिवाय मृत विमानात होते की जमिनीवर हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विमानाने ऑरेंज काउंटीतील फुलरटन म्युनिसिपल विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर २ मिनिटांतच ते इमारतीवर कोसळले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आजूबाजूचा परिसरही रिकामा करण्यात आला आहे. ज्या इमारतीला विमान धडकले ती इमारत फर्निचर बनवण्यासाठी वापरली जात होती. अपघाताच्या वेळी इमारतीत सुमारे २०० लोक काम करत होते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |