नवी दिल्ली – सियाचीनमध्ये १९ जुलै रोजी लष्कराच्या तंबूला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या कॅप्टन अंशुमन यांच्या कुटुंबाला आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंडातून १ कोटी रुपये देण्यात आले. ही रक्कम अंशुमन यांचे आई-वडील आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये अर्धी वाटून देण्यात आली. दरम्यान, अंशुमन यांनी आपली पत्नी स्मृती यांना नॉमिनी ठेवल्याने त्यांची पेन्शन फक्त स्मृती यांना दिली .
लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “कॅप्टन अंशुमन मार्च २०२० मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये रुजू झाले होते. अंशुमन यांनी आपल्या पत्नीला नॉमिनी बनवले होते.त्यामुळे त्यांना अधिक लष्करी लाभ मिळत आहेत. अंशुमन यांचे वडील सैन्यात निवृत्त जेसीओ आहेत. त्यामुळे त्यांना पेन्शन आणि लष्कराच्या इतर सुविधा मिळतात. लष्कराने याआधीही अशा समस्यांचा सामना केला आहे.विशेषत: शहीदांचे पालक त्यांच्यावर अवलंबून असतात तेव्हा अशा समस्या उद्भवतात. मात्र अंशुमन यांचे वडीलही सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत ही समस्या उद्भवणे हे दुर्दैव आहे.