लखनऊ- उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात आज रविवारी पहाटे चारच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला.फिरोजपूरहून धनबादला जाणाऱ्या ‘किसान एक्स्प्रेस’चे डबे अचानक वेगळे होवून एक्स्प्रेसचे दोन भाग झाले. इंजिन ८ डबे मागे सोडून १३ डब्यांसह ४ किमी धावले. रायपुर रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली.सुदैवाने यात एकही प्रवासी जखमी झाला नाही
ही किसान एक्स्प्रेस
झारखंडमधील धनबादहून पंजाबमधील फिरोजपुरला चालली होती.मात्र चक्रमाळजवळ दोन बोगीचे कपलर तुटल्याने हा अपघात झाला. एकूण २१ डबे होते, अपघातानंतर ८ डबे मागे राहिले आणि १३ डबे घेऊन इंजिन ४ किमी पुढे धावत सुटले.यावेळी या ट्रेनचा वेग ८० ते ९० किलोमीटर इतका होता. एक तासांच्या प्रयत्नांनंतर एक्स्प्रेसचे दोन्ही भाग पूर्ववत जोडण्यात आले आणि गाडी नियोजित स्थळी रवाना करण्यात आली.या गाडीमधून पोलीस भरतीचे बरेच उमेदवार प्रवास करत होते.अचानक रेल्वेचे डबे वेगळे झाल्याची बातमी प्रवाशांना मिळताच मात्र एकच खळबळ माजली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.