कन्नड अभिनेत्री निवेदिका अर्पणाचे कॅन्सरने निधन

बंगळूरू-कन्नड चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री, सुप्रसिद्ध निवेदिका अर्पणा यांचे आज बंगळुरू मध्ये वयाच्या ५१ व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांचे पती नागराज वस्थारे यांनी आज समाजमाध्यमावर एका व्हिडीओ पोस्टमधून ही माहिती दिली. त्यांचा कर्करोग चौथ्या टप्प्यात पोहोचला होता असेही त्यांनी त्यात म्हटले आहे.अर्पणा यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९८४ साली आलेल्या मासांदा हुवू या चित्रपटापासून झाली. थोड्याच वेळात एक उत्तम अभिनेत्री म्हणून त्या नावारुपाला आल्या. इन्स्पेक्टर विक्रम, या शिवा राजकुमार यांच्या बरोबरच्या चित्रपटाने त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी चंदन टीव्हीवरील एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ते प्रेक्षकांना इतक आवडले की त्यानंतर त्या निवेदन क्षेत्रात रमल्या. रेडिओ जॉकी, कॉमेडियन अशा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यांनी दोन लोकप्रिय मालिकांचीही निर्मिती केली. अर्पणा यांच्या निधनाने कन्नड चित्रपट आणि टीव्ही विश्वाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top