सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या नितेश राणेंनी हॅट्रिक केली आहे. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संदेश पारकर मैदानात होते. पारकर यांना पराभूत करून नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर कणकवलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
विजयानंतर नितेश राणे म्हणाले की, कणकवली, वैभववाडी आणि देवगडच्या जनतेने तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली आहे. २६२ गावांमध्ये फिरतानाच याची मला जाणीव आली होती. जनतेने मला सांगितले की, चिंता करू नका तुम्ही राज्यात हिंदुत्वासाठी केलेले काम आम्हाला पसंत आहे. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. राज्यात महायुती जिंकलेली आह. भगवाधारींचे राज्य आलेले आहे. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात ‘अल्लाह हु अकबर’ नाही,तर ‘जय श्री राम’चे नारे ऐकायला येणार. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीलाच सांगितले होते की, ही निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे. मी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे जिहादींनी माझ्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात विष पसरवण्याचा प्रयत्न केला. पण मला जनतेने साथ दिली.