महेंद्रगिरी – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने काल त्यांच्या क्रायोजेनिक इंजिनच्या वॅक्यूम इमिग्रेशनची चाचणी केली असून ही चाचणी यशस्वी ठरली आहे. गगनयान मोहिमेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जात आहे.इस्रोच्या तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रॉपल्शन विभागात ही चाचणी घेण्यात आली. इस्रोने म्हटले की, अंतराळातील पोकळीत व्हॅक्युम स्थितीत मल्टी एलिमेंट इग्नायटर सह एलवीएम ३ ला उच्चत्तम श्रेणीची ऊर्जा देणाऱ्या स्वदेशी सीई२० या क्रायोजेनिक इंजिनचे प्रजल्वन यशस्वीरित्या पूर्ण केले. गगनयान मोहिमेसाठी हे परिक्षण महत्त्वपूर्ण असून या मोहिमेत भारत पहिल्यांदा अंतराळात मानव पाठवणार आहे. अंतराळात उड्डाण करतांना क्रायोजेनिक इंजिनला दुसऱ्यांदा सुरु करणे आव्हानात्मक असते. त्यावरही संशोधन करण्यात येत आहे.
इस्रोच्या क्रायोजेनिक इंजिनच्या व्हॅक्युम इमिग्रेशनची चाचणी यशस्वी
