दिसपूर – आसाम मेघालयाच्या सीमेवरील दिमा हसाओ जिल्ह्यातील कोळसा खाणीत पाणी भरल्याने अडकलेल्या तीन मजूरांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. एका मजूराचा मृतदेह बुधवारी काढण्यात आला होता. खाणीत अद्यापही काही मजूर अडकले असल्याचे बचाव दलाने म्हटले आहे.
दिमा हसाओ जिल्ह्यातील या खाणीत ६ जानेवारी रोजी अचानक पाणी भरल्याने काही मजूर अडकले होते. त्यातून काही मजुरांना बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतरही खाणीत ११ मजूर अडकले होते. त्यातील चार मजुरांचे मृतदेह आतापर्यंत काढण्यात आले आहेत. या खाणीत अद्यापही ७ मजूर अडकले आहेत. त्यांची जिवंत वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.