पंढरपूर – आषाढी एकादशी अवघ्या १५ दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून तयारीच्या कामाला वेग आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता यावेळी मंदिर समितीने प्रसादासाठी ११ लाख लाडू बनवण्याची तयारी सुरु केली आहे . या लाडूत सुक्या मेव्याचा वापर करण्यात आला आहे. लाडू बनवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत २ लाख लाडू तयार करण्यात आलेले आहेत . त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची वारी गोड होणार आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून १० लाखांहून अधिक वारकरी पंढरपूरला येत असतात . पंढरपूर नगर परिषदेकडून पिण्याच्या पाण्यापासून शौचालये , स्नानगृह आदी सर्व सोयी उपलब्ध केल्या आहेत .