तिरुमला – १० जानेवारी रोजी तिरुमला मंदिरात शुभ वैकुंठ एकादशी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तिरुमला तिरुपती देवस्थानने येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरातील वैकुंठद्वार दर्शनासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. यामध्ये भाविकांनी तिकिटासाठी ३०० रुपये दिल्यास त्यांना विशेष प्रवेश दर्शन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
तिरुपती मंदिरात वैध दर्शन तिकीट असलेल्या भाविकांनाच फक्त वैकुंठ द्वारम येथून दर्शनासाठी परवानगी देण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे.यामध्ये टोकन नसलेल्या भाविकांना मंदिराच्या दर्शनासाठी परवानगी दिली जाणार नाही.भाविकांनी तिकिटासाठी ३०० रुपये मोजल्यास त्यांना विशेष प्रवेश दर्शन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.