अमेरिकेतील मंदीच्या शंकेने शेअर बाजार दणकून कोसळला

मुंबई – अमेरिकेत आर्थिक मंदी निर्माण होण्याची शक्यता तसेच जपानच्या शेअरबाजारातील येन ट्रेड बंद झाल्याचा परिणाम आज मुंबईच्या शेअर बाजारावरही पडला. आजचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला असून गुंतवणूकदारांचे १७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. आज सकाळी बाजार सुरु झाल्याबरोबर ही घसरण दिसून आली. त्यानंतरही दिवसभर शेअर बाजार पूर्णपणे सावरू शकला नाही. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २,२२२ अंकांची घसरण नोंदवत ७८,७५९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही २.६८ टक्क्यांची म्हणजेच ६६२ अंकांची घसरण झाली आणि तो २४,०५५ अंकांवर बंद झाला. भारतीय रुपयाच्या मूल्यातही आज मोठी घसरण झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top