तिरुअनंतपुरम – मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेता दिलीप शंकर काल सकाळी संशयास्पदपणे एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे दक्षिणात्य सिनेक्षेत्राला धक्का बसला. मात्र दिलीप शंकर यांनी आत्महत्या केली की, नैसर्गिक मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दिलीप शंकर ‘पंचाग्नी’ या टीव्ही शोच्या शूटिंगमुळे ते अनेक दिवसांपासून याच हॉटेलमध्ये राहत होते. गेल्या काही दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडले नव्हते. खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ही खोली उघडली असता ते मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत अनेक तर्क लावले होत आहेत. ‘पंचाग्नी’ शोच्या दिग्दर्शकाने सांगितले की, दिलीप शंकर गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु त्यांना कुठला आजारल होता याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही.