अभिनेता अल्लू अर्जूनवरआणखी एक गुन्हा दाखल

हैदराबाद – तेलगू सिनेसृष्टीचा सुपरस्टार अल्लू अर्जून याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुष्पा-२ चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेत काँग्रेसचे नेते थिनमर मलान्ना यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.मलान्ना काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी काल मेदिपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुष्पा-२ या चित्रपटात काही दृश्यांमुळे पोलीस दलाची बदनामी झाली,अशी तक्रार मलान्ना यांनी केली आहे.या दृश्यांत एक तरुण स्विमिंग पूलमध्ये लघुशंका करताना दिसत असून त्याच्या बाजूला पोलीस कर्मचारी उभा आहे.या दृश्यामुळे पोलीस कसे कुचकामी आहेत,हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,असा आक्षेप मलान्ना यांनी घेतला आहे.काही दिवसांपूर्वी पुष्पा -२ च्या प्रदर्शनादरम्यान अल्लू अर्जून उपस्थित राहिला होता. त्याच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. तेव्हा झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी अल्लू अर्जून याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, अल्लू अर्जुनने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केल्यास त्याचा एकही चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही असा काँग्रेसचे आमदार आर भूपती रेड्डी यांनी अल्‍लू अर्जूनला इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top