पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले . अजित पवार हे काल नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी ते भगूर नगर परिषदेतर्फे नगरोत्थान अभियानांतर्गत भगूर शहरासाठी २४.६८ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करून ते पुण्याला आले होते. रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि पुण्याहून ते मुंबईला आले. राजकीय अडचणीचे प्रसंग आले की अजित पवार नेहमी आजारी पडतात अशी चर्चा सुरू आहे.
अजित पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द
