मुंबई – उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा पसरली आहे.या आठवड्यात शहरातील तापमान २० अंशापर्यंत राहिले आहे.मात्र पुढील पारा आणखी घसरून ३१ डिसेंबरला मुंबईत थंडीची थंडीची लाट येणार असून यादिवशी मुंबईकर थंडीने कुडकुडण्याची शक्यता आहे.यादिवशी किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज आहे.हे तापमान २ जानेवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
काल शुक्रवारी सांताक्रुझ वेधशाळेने शहरातील किमान तापमान १८.५, तर कमाल ३०.८ अंश नोंदवले, तर कुलाबा वेधशाळेने किमान २१.१ तर कमाल २९.९ अंश तापमानाची नोंद केली.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत १९ अंश इतके तापमान घसरण्याची शक्यता आहे.यंदाचा डिसेंबर महिना हा सर्वाधिक थंडीचा महिना ठरला. यंदाच्या डिसेंबरमध्ये किमान तापमान १३.७ अंश नोंदवले गेले आहे.गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात किमान तापमान होते.३१ डिसेंबरला मुंबईकरांना कडाक्याची थंडी अनुभवता येणार असून यादिवशी आकाश निरभ्र राहील.