२३ फेब्रुवारीला सावंतवाडीत संत गाडगेबाबा जयंती सोहळा

सावंतवाडी – श्री संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सेवा संघ सावंतवाडी तालुक्याच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी कळसुळकर हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे मच्छी मार्केट नजीक संत गाडगेबाबा जयंती व तिसरा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. परीट समाजाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे श्री संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० वाजता मच्छी मार्केट, भाजी मंडई व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे, सकाळी १० वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व नामस्मरण, सकाळी १०.३० वाजता स्वागत समारंभ, दीप प्रज्वलन, सत्कार, मान्यवरांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण तर दुपारी १२ वाजता संत गाडगेबाबा महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता महाप्रसाद तर दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, दुपारी ४ वाजता सुश्राव्य भजन व सायंकाळी ५ वाजता आभार प्रदर्शन व समारोप असे कार्यक्रम कळसुळकर कॉलेज व जुनिअर कॉलेज सावंतवाडी येथे श्री संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संघ सावंतवाडी तालुका यांच्या वतीने आयोजित केले आहेत. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील परीट समाजातील सर्व बंधू भगिनींनी, सावंतवाडीतील नागरिकांनी गाडगेबाबांच्या भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत गाडगेबाबा महाराज परीट सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र भालेकर, तालुका सरचिटणीस लक्ष्मण बांदेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top