नवी दिल्ली: १३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल ईडीने दिल्ली, गुरुग्राम, महेंद्रगड, बहादूरगड आणि जमशेदपूर या ५ शहरातील १५ ठिकाणी छापे टाकले. बँक घोटाळ्यातील महेंद्रगडचे आमदार रवदन सिंह आणि त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरोधात हा छापा टाकला आहे.
आमदार रवदन सिंह आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या अलाइड स्ट्रिप्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून १३९२ कोटी रुपयांचे कर्ज २०२२ मध्ये घेतले होते, परंतु ते बँकेला परत करण्यात आलेले नाही. या प्रकरणी सीबीआयने कंपनी आणि तिचे प्रवर्तक मोहिंदर अग्रवाल आणि गौरव अग्रवाल आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट म्हणजेच पीएमएलए अंतर्गत स्वतंत्र एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. काँग्रेसचे आमदार रवदन सिंह हे भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या जवळचे आहेत. महेंद्रगड येथील रवदन सिंह यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढवली होती.