पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस परीक्षा लवकर होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन, एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. इयत्ता १०वीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपातील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेत परीक्षेस उपस्थित रहावे. इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले आणि व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये आणि याची नोंद घ्यावी, असेही कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |