मुंबई – कोस्टल रोडवर हिरे व्यापाऱ्याच्या बीएमडब्ल्यू गाडीच्या धडकेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी हिरे व्यापारी राहिल हिंमाशु मेहता (४५) याला अटक करून यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.नंतर या व्यापाऱ्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
या अपघातातील मृत कामगाराचे नाव काश्मिर मिसा सिंह असे आहे. हा कामगार गेल्या पाच वर्षांपासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या साईटवर वेल्डींगचे काम करत होता आहे.नेहमीप्रमाणे सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सर्व कामगार कामावर हजर झाले.१७ सप्टेंबर रोजी पूजा असल्याने कोस्टल रोड प्रवेशद्वार क्रमांक २ वरळी दूध डेरीसमोर मंडप
बांधण्याचे काम सुरू होते. तेथे उभा असताना अचानक कोस्टल रोडच्या दक्षिण वाहिनीच्या दिशेने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने सिंहला जोरात धडक दिली.यात त्याचा जागीच मृत्यू झाला.