हिमाचल प्रदेशमध्ये २ पर्यटकांचा पॅराग्लाय डिंगवेळी पडून मृत्यू

शिमला – हिमाचल प्रदेशातील कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात २४ तासांत पॅराग्लायडिंगच्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. हे पर्यटक अहमदाबाद आणि तामिळनाडू येथील होते. अहमदाबाद येथील भावसार खुशी (१९) या तरुणीचा पॅराग्लायडिंग करताना धर्मशालाजवळील इंद्रनाग पॅराग्लायडिंग साइटवर दरीत पडून तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत पॅराग्लायडिंग पायलटही नदीत पडला. तो जखमी झाला आहे. जखमी पायलटला उपचारासाठी तांडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.दुसर्‍या घटनेत कुल्लू जिल्ह्यातील गरसा लँडिंग साइटजवळ पॅराग्लायडिंग करताना तामिळनाडूतील २८ वर्षीय जयश रामचा मृत्यू झाला.पॅराग्लायडरची चुकून दुसऱ्या पॅराग्लायडरला टक्कर होऊन जयश दरीत कोसळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला, तर पायलट अश्विनी कुमार गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी चंदीगडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top