डेहराडून – हिमाचल प्रदेशमध्ये मागील दोन दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काल चंबामध्ये राष्ट्रीय महामार्गावर अचानक डोंगराचा एक मोठा भाग कोसळला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरड कोसळताना एक कार महामार्गावरून चालली होती. कारच्या समोरच दरड कोसळली. मात्र सुदैवाने कारचालकाने वेळीच गाडी थांबल्याने तो थोडक्यात बचावला.
हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये हायवेवर दरड कोसळली
