बैरुत – लेबनॉनमधील हिजबुल्लाहचा सर्वोच्च नेता शेख मुहम्मद अली हमादी याची हत्या करण्यात आली. , तो बेका व्हॅलीमध्ये त्याच्या घराबाहेर उभा होता तेव्हा दोन वाहनांमधून आलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात हमादीला अनेक गोळ्या लागल्या होत्या. यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. गोळीबारानंतर अज्ञात हल्लेखोर पळून गेले, स्थानिक प्रशासन घटनेचा तपास करत आहे.
हमदीच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच त्याची जबाबदारी अद्याप कोणी घेतलेली नाही. ही हत्या राजकीय नसून चार वर्ष जुना कौटुंबिक वाद यामागे कारण असू शकतो. त्याचबरोबर या हत्येमागे इस्रायलचा हात असल्याचेही बोलले जात आहे . हमदीच्या हत्येनंतर लेबनीज सुरक्षा दलांनी त्याचा तपास सुरू केला आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने अद्याप या हत्येबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील लेबनॉनमधील युद्धविराम संपुष्टात येत असताना ही हत्या झाली आहे.
एफ बीआय बऱ्याच दिवसांपासून हमादीचा शोध घेत होती. १९८५ मध्ये पश्चिम जर्मन विमानाचे अपहरण केल्याप्रकरणी त्याला हवा होता. १३ ऑक्टोबर १९८५ रोजी पॅलेस्टाईन लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) चार दहशतवाद्यांनी पश्चिम जर्मनीहून उड्डाण करणाऱ्या अमेरिकन ‘टीडब्ल्यूए फ्लाइट ८४७ ‘चे अपहरण केले. या विमानात १४८ प्रवासी आणि क्रू मेंबर होते.