सोलापूर- सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा यंदा रविवार १२ जानेवारीपासून सुरू होणार आहे.ही यात्रा १६ जानेवारीपर्यंत चालणार आहे.तब्बल ९०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला सोलापूरमध्ये ‘गड्डा यात्रा’ म्हणुन ओळखले जाते.
या यात्रेमध्ये माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.या यात्रेसाठी कर्नाटक, तेलंगणा,आंध्रप्रदेश आदी राज्यातीलही भाविक हजेरी लावत असतात.या यात्रेनिमित्त सिद्धेश्वर मंडळातर्फे उल्हासनगर-४ येथे १३ जानेवारीला महापूजा आयोजित केली. यंदा सोलापुरात यात्रेच्या पहिल्या दिवशी १२ जानेवारी रोजी ६८ लिंग प्रदर्शन,१३ जानेवारी रोजी अक्षता कार्यक्रम, १४ जानेवारी होम हवन असे कार्यक्रम होणार आहेत.