जळगाव – जळगावच्या सराफा बाजारात काल सोन्याच्या दराने नवा उच्चांक प्रस्थपित केला. सोन्याचा दर प्रतितोळा ९१ हजार ४६४ रुपये इतका झाला. हा आजवरचा नवा उच्चांक आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदी जीएसटीसह १ लाख ४ हजार ५४५ रुपयांवर पोहोचली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगारलेल्या आयात शुल्कवाढीच्या बडग्यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदार सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करू लागले आहे. परिणामी या मौल्यवान धातूंच्या दरात तेजी आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात काल सोन्याचा दर प्रति औंस ३,००४ डॉलरपर्यंत वधारला. अलीकडच्या काळात सोन्याच्या दराने सलग तेरा वेळा नवनवीन उच्चांक गाठले आहेत.
सोन्याचा नवा उच्चांक चांदी एक लाखाच्या पार
