नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) नवे लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर यासंबंधीची माहिती गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली.
न्या. मिश्रा यांच्यावर बीसीसीआयचे लोकपाल आणि आचारसंहिताविषयक अधिकारी अशी दुहेरी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्या. मिश्रा यांनी ७ जुलै २०१४ ते २ सप्टेंबर २०२० या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
निवृत्तीनंतर २ जून २०२१ रोजी त्यांची राष्ट्रीय मानव हक्क संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.१ जून २०२४ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.सन १९७८ पासून त्यांनी वकिलीच्या क्षेत्रात कारकीर्द सुरू केली होती.सन १९९८-९९ बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले. देशात सनसनाटी निर्माण करणाऱ्या जस्टीस लोया मृत्यू प्रकरण त्यांच्या कोर्टाकडे वर्ग केल्याने वाद निर्माण झाला होता . सुप्रिम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन याला जाहीर विरोध केल्यानंतर या प्रकरणापासून त्यांना दूर केले होते . त्यानंतर न्यायालयाच्या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान मोदी यांची खूप स्तुती केली होती . याबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती .