वॉशिंग्टन – गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकून पडलेल्या सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या स्पेसएक्सच्या यानाचे उड्डाण काल प्रक्षेपण केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे रद्द करावे लागले. यामुळे दोघे अंतराळवीर संकटात सापडले आहेत. त्यांचे पृथ्वीवरील आगमन लांबले आहे.नासाच्या केनेडी अंतराळ केंद्रावरून काल सायंकाळी अवकाश स्थानकासाठी यान रवाना होणार होते. उड्डाणाची उलटी गणतीही सुरू झाली होती. मात्र उड्डाणाला चार तास शिल्लक असताना यान अवकाशात प्रक्षेपित करणाऱ्या फाल्कन रॉकेटला आधार देणाऱ्या यंत्रणेत दोष आढळून आला. त्यामुळे ऐनवेळी उड्डाण रद्द करण्यात आले. नासा या स्पेसएक्स यानातून चार अंतराळवीरांना अवकाश स्थानकावर पाठविणार होते. हे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांची जागा घेतील. अमेरिका, जपान आणि रशिया या देशांमधून या अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे.
सुनिता विल्यम्स अडचणीत यानाचे उड्डाण लांबणीवर
