सावंतवाडी मोती तलावाचा पादचारी मार्ग खचत चालला

सावंतवाडी – शहरातील कायम वर्दळीचा परिसर समजल्या जाणार्‍या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावरील पादचारी मार्ग खचत आहे. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्याना समोरील फुटपाथ खचला आहे. याठिकाणी सकाळी आणि रात्री फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांना त्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
मोती तलावाचे बांधकाम दगडी आहे. तरीही या तलावाचा काठ देखील खचत चालला आहे. शिव उद्यान समोरील हा पदाचारी मार्ग खचलेल्या अवस्थेत आहे. या परिसरात सकाळ, संध्याकाळ आणि जेवणानंतर रात्री चालण्यासाठी ज्येष्ठ व महिलांसह शेकडो नागरिक येतात. दररोजचा वर्दळीचा हा मार्ग आहे. त्यामुळे या भागात नगरपरिषद प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून अनर्थ टाळावा अशी मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यापूर्वी या शेजारील भाग सिमेंट कॉक्रीटचा वापर करून नव्याने बांधला होता. येथील काठाचा वरचा भाग देखील नव्याने बांधला होत. मात्र, आता पादचारी मार्ग खचत चालला असून दुर्घटना घडण्यापुर्वी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top