शिर्डी – शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देश- विदेशातून दर्शनासाठी येत असतात. यातील काही भाविक हे साईबाबाच्या चरणी रोख रक्कम किंवा सोने- चांदीचे दागिने अर्पण करत असतात. जम्मू काश्मीरच्या जोडप्याने १३ लाखांचा सोन्याचा हार साईचरणी अर्पण केला.
मूळचे जम्मू काश्मिर येथील रहिवासी असलेले नवीन टिकू यांच्या परिवाराची शिर्डी साईबाबांवर प्रचंड श्रद्धा आहे. खूप वर्षांपासून साईबाबांच्या चरणी काहीतरी दान देण्याची त्यांची पत्नी बबिता टिकू यांची इच्छा होती. त्यामुळे पत्नीचा इच्छेचा मान ठेवत त्यांनी नवीन वर्षा निमित्ताने शिर्डी साईबाबा संस्थानला २०६ ग्रॅम वजनाचा आणि १३ लाख ३० हजार ३४८ रुपये किमतीचा सोन्याचा हार दान दिला.