सदा सरवणकर,मनीषा कायंदे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा, सदा सरवणकर यांची नामनिर्देशित सदस्य तर मनिषा कायंदे,श्रीराम रावराणे आदीची जिल्हा नियोजन समितीवर निवड करण्यात आली आहे. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय काल गुरुवारी जारी केला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.मात्र, विधानसभेला नाराज आमदारांकडून दगाफटका होऊ नये,यासाठी महामंडळे,विविध समित्या देण्यात येणार आहे.नुकतेच हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी तर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

त्यानंतर आता विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून नामनिर्देशीत सदस्य म्हणून मिलिंद देवरा,सदा सरवणकर आणि जिल्हा नियोजन समितीवर
मनिषा कायंदे ,श्रीराम रावराणे,गोपाळ दळवी, मीना कांबळी यांची नियुक्ती केली आहे.त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा अनुभव असलेले ‘विशेष निमंत्रित’ म्हणून दत्ता नरवणकर, सिद्धार्थ कासारे, सिद्धार्थ गमरे,शलाका साळवी,सतीश तिवारी, जितेंद्र सोनावणे यांना संधी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top