नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १० टक्के केल्याने श्रीलंकामध्ये कांदा निर्यात वाढणार आहे.
सध्या लाल कांद्याची आवक वाढली असून बांगलादेशने निर्यातीवर घेतलेला निर्णय सकारात्मक ठरताना दिसत आहे. श्रीलंकेला दररोज २५ ते ३० हजार बॅग इतका कांदा लागतो. ही गरज आता भारत भागवणार आहे. श्रीलंकन चलनाप्रमाणे सध्या कांदा ३०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळणार आहे.