मुंबई – सोमवारच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२८.१० अंकांनी वाढून २२,९५७.२५अंकावर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३५.२४ अंकांनी वाढून ७५,९०१.४१ अंकांवर बंद झाला.रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवस्थेत १.५ लाख कोटी रुपयांची गंगाजळी आणल्यामुळे आज बँकांच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ दिसून आली. बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये ४.३९ टक्के, अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये ३.८२ टक्के, बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये ३.२८ टक्के तर एचडीएफसीच्या शेअरमध्ये २.५१ टक्के वाढ झाली.सेन्सेक्सवरील कंपन्यांपैकी सर्वाधिक २.१५ टक्क्यांची वाढ टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये झाली. मात्र त्याचवेळी सन फार्मा (४.४७ टक्के), लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, आयटीसी आणि एचसीएल टेक (१ ते १.५ टक्के) या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.
शेअर बाजार तेजीसह बंद प्रमुख निर्देशांकांत वाढ
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/08/bombay-stock.jpg)