मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५२८ अंकांनी घसरून ७७,६२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६२ अंकांच्या घसरणीसह २३,५२६ अंकांवर बंद झाला.बँक निफ्टीदेखील ३३१ अंकांनी घसरून ४९,५०३ अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तु (एफएमसीजी) वगळता आज सर्वच निर्देशांकांत घसरणी झाली. निफ्टी रिय़ल्टी आणि निफ्टी एनर्जी या निर्देशांकांमध्येही मोठी घसरण नोंदविली गेली.निफ्टीवर ओएनजीसी, (-३ टक्के), श्रीराम फायनान्स (-३ टक्के), बीपीसीएल( -२ टक्के) आणि कोल इंडिया (-२ टक्के) या कंपन्यांचे शेअर घसरले. तर बजाज ऑटो,नस्ले, एम अँड एम, कोटक महिंद्रा बँक या शेअरमध्ये वाढ झाली.
शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्सने ५२८ अंक गमावले
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/08/bombay-stock.jpg)