शीना बोराची ‘गायब’ झालेली हाडे अचानक सीबीआयला सापडली

मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणी शीनाचे अवशेष असावे अशी जी हाडे सापडली होती ती गायब झाल्याचे न्यायालयात सांगणाऱ्या सीबीआयने अचानक यु-टर्न घेतला. हे अवशेष आपल्याच ‘मालखान्यात ‘ सापडल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. कोणत्याही गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत सीबीआय तपासादरम्यान सापडलेले सर्व पुरावे ज्या बंद खोलीत जपून ठेवते त्याला मालखाना असे म्हणतात. या मालखान्यात शीनाच्या कथित हाडांचे अवशेष अचानक सापडले असे सीबीआयचे म्हणणे आहे.

हे हाडांचे कथित अवशेष हा या हत्याप्रकरणातील एक महत्वाचा पुरावा आहे. परंतु तोच सीबीआयकडून गहाळ झाला होता.मात्र आता हे अवशेष जरी सापडल्याचे सीबीआयने सांगितले. तरीही पुरावा म्हणून ते आपण सादर केलेले नाही,अशी कोलांटउडीही सीबीआयने मारली.म्हणजे हे अवशेष पुरावा म्हणून न्यायालयात सादर न करता सीबीआय जेजे रुग्णालयातील अॅनॉटॉमी विभागाच्या प्रोफेसर झेबा खान यांची चौकशी करणार आहे. खटल्यात सुरुवातीला शीनाच्या हाडांचे हेच अवशेष खटल्यातील महत्वाचा पुरावा आहेत,असे सीबीआयने न्यायालयात सांगितले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top