अहिल्यानगर – शिर्डीतील साईबाबा मंदिराच्या कळसाला तब्बल सोळा वर्षांनी सुवर्णमुलामा लावण्यात येत आहे. या कामासाठी हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांनी साईमंदिर संस्थानाला देणगी दिली. यापूर्वी जुलै २००७ मध्ये याच देण्गीदाराने कळसाला सुवर्णमुलामा देण्यासाठी देणगी दिली होती. या कळसाला सुवर्ण मुलामा देण्याच्या कामासाठी किती सोन्याचा वापर होणार, यासंदर्भातील माहिती त्यांनी गुप्त ठेवली आहे. याशिवाय विजयकुमार यांनी सुवर्ण मुलामा दिलेल्या कळसाला विद्युत रोषणाई करू नये. अशी सूचना मंदिर संस्थानला दिली. या विद्युत बल्बच्या उष्णतेमुळे या मुलाम्याला तडे जातात. यासाठी त्यांनी तिरुपती बालाजी आणि द्वारका मंदिरांचे उदाहरण दिले आहे.
साईबाबा संस्थान देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून अनेक सामाजिक कार्ये चालतात. अनेक साईभक्तांनी मंदिराला सोने आणि चांदीच्या वस्तू दान केल्या आहेत. या दानामुळे मंदिराची शोभा वाढली आहे.
शिर्डी साई मंदिराच्या कळसाला सुवर्णमुलामा
