शिर्डी – शिर्डी येथील साईबाबा हे हिंदूच होते. त्यामुळे ते मुसलमान असल्याच्या प्रचाराला बळी न पडता हिंदूंनी त्यांची भक्ती करावी असा दावा धर्मगुरु कालीचरण यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विशेष करुन उत्तर भारतात साईबाबांच्या विषयी निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.कालीचरण यांनी म्हटले आहे की, साईबाबा हे कट्टर हिंदू होते. त्याचे प्रमाण मी दिलेले आहे. जन्म व कर्माने साई बाबा हिंदू होते. हिंदू संस्कार व परंपरेत साईबाबांचा जन्म झाला. तेव्हा हिंदूंनी साईबाबांविषयी निर्माण केलेल्या संशयाला थारा देऊ नये व साईबाबांची भक्ती करावी. उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये साईबाबांच्या धर्मावरून वाद निर्माण झाला होता. त्यांची देवाप्रमाणे पूजा न करण्याचे आवाहनही काही धर्मगुरुंनी दिले होते.
शिर्डीतील साईबाबा हिंदूच होते धर्मगुरु कालीचरण यांचा दावा
