मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आमदार, खासदार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक बोलवली आहे. २८ फेब्रुवारीला ही बैठक वाय बी चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या बैठकीला शरद पवार हे स्वतः उपस्थित राहून सध्या राज्यातील राजकारणाचा आणि तसेच पक्षांतील अंतर्गत परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ही पहिलीच मोठी बैठक होत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचे की एकला चलोची भूमिका घ्यायची, याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शरद पवार गटाची २८ फेब्रुवारीला बैठक
